सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड शहरांत इंदुमती नेत्रालय रुग्णालयात इंदुमती पुंडलिकराव आकाते यांच्या स्मरणार्थ व छत्रपती शिवराज्यभिषेक दिनानिम्मित दरवर्षीप्रमाणे मोफत नेत्र व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात काचबिंदु, मोतीबिदु व रेटिना तपासणी शिबिर इंदुमती नेत्रालय व सोनोग्राफी सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. यात ९५ रुग्ण तपासण्यात आले. त्यापैकी २२ रुग्ण हे काचबिंदु या आजाराचे आढळले. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्यभिषेक निमित्त व स्व सौ इंदुमती स्मरणार्थ दोन्ही प्रतिमेस पुष्पहार घालून व अभिवादन करुन करण्यात आले.













